Tuesday, 31 December 2013

सौर ऊर्जेच्या साठवणीसाठी नवीन पर्यायांच्या शोधात चीन

चीन येथील कॅटलिना पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी आणि अन्य आंतरराष्ट्रीय सहकारी संस्था आरसे, प्रक्रियायुक्त ल्युनार माती आणि उष्णता प्रक्रिया यांचा संगम करत सौर ऊर्जानिर्मितीचा प्रकल्प राबवीत आहेत. त्यासाठी चंद्रावरील दिवसाच्या सूर्यप्रकाशाचा वापर करण्याची योजना त्यामध्ये अंतर्भूत आहे. ही योजना सध्या चीनतर्फे चंद्रावर पाठविण्यात आलेल्या रोव्हर यानाच्या ऊर्जेची पूर्तता करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.चंद्रावरील ल्युनार रात्री 14 दिवसांच्या असतात. रात्रीच्या वेळी तापमान वजा 150 अंश सेल्सिअसपर्यंत उतरते. याचा परिणाम चंद्रावर रोव्हरसारख्या वाहनाच्या हालचालींमध्ये किंवा त्यावरील उपकरणांच्या कामकाजावर होत असतो. सध्या या प्रचंड थंडीवर मात करण्यासाठी पृथ्वीवरून अवजड बॅटऱ्या पाठवाव्या लागतात किंवा अणू ऊर्जेचा वापर करावा लागतो. चीनने चंद्रावर पाठवलेल्या युतू या रोव्हर यानामध्ये अणू ऊर्जेचा वापर केला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी चीनमधील कॅटलिना विद्यापीठातील संशोधकांनी अमेरिकेतील सहकारी संशोधन संस्थांच्या मदतीने चंद्रावरील दिवसांची सौर ऊर्जा साठविण्यासाठी व रात्रीच्या वेळी वापरण्यासाठी दोन पर्यायांचा विचार केला आहे. त्याविषयी जर्नल ऍक्टा ऍस्ट्रोलॉटिका या संशोधनपत्रिकेमध्ये नासा संस्थेतील माजी प्रशासक मायकेल ग्रीफीन, ब्लेई क्लिमेंट, ऑस्कर टोर्रोबा, रिचर्ड गोन्झालेझ- सिन्का यांच्यासह नारायणन रामचंद्रन यांनी लेख लिहिला आहे.पहिला पर्याय -- चंद्राच्या मातीमध्ये असलेल्या ऍल्युमिनिअमसारख्या घटकांचा वापर करून उष्णता वस्तुमान साठविण्याची यंत्रणा उभारणे.- यामध्ये सूर्याचा प्रकाश पृष्ठभागावर पडताच, त्याचे परावर्तन आरशांच्या साह्याने करून उष्णता वस्तुमानात त्याचे रूपांतर करण्यात येऊ शकते. पुढे रात्रीच्यावेळी ही उष्णता रोव्हर आणि अन्य उपकरणे चालविण्यासाठी वापरता येईल.दुसरा पर्याय ः- यामध्ये आरशांच्या परावर्तनाचाच आधार घेण्यात येणार आहे. एकमेकांच्या समोरासमोर असलेले हे आरसे एकमेकांकडे प्रकाश ऊर्जेचे परावर्तन करतील आणि त्यातून उष्णता निर्माण करण्यात येऊ शकते.- हे आरसे फ्रेसनेल परावर्तक असतील. ते सूर्याचे किरण द्रवाने भरलेल्या नलिकेवर केंद्रित करतील. त्यामध्ये उष्णता ऊर्जेची साठवण केली जाईल.- रात्रीच्या वेळी रोव्हरकडे ही उष्णता पाठवली जाईल.उपयुक्तता :- 2020 पर्यंत नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि चीन राष्ट्रीय स्पेस प्रशासनासह भारत आणि जपानसारख्या अनेक देशांच्या चांद्रयानांच्या योजना कार्यान्वित होणार आहेत. त्यांना या पर्यायातून ऊर्जेची उपलब्धता होऊ शकेल.- भविष्यात पाठवल्या जाणाऱ्या प्रत्येक मानवरहित अथवा मानवसहित यान आणि उपकरणांसाठी ऊर्जेची शाश्वती या सौर - उष्णता प्रकल्पातून होऊ शकेल.

No comments:

Post a Comment

Total Pageviews