गावात एक म्हातारी एकटीच राहते. तिला एकच मुलगी होती. तिचं लग्न होऊनही आता चाळीस वर्षं झाली. ती काही वर्षांपूर्वीच वारली आहे. आपल्या आईला भेटल्याशिवाय तिला चैन पडायचं नाही. शेतीची कामं संपली की ती आईकडेच राहायची. गावात तिची दीड एकर शेती आहे. ती शेती चुलत भावाला दिली. म्हातारीने बक्षीसपत्रच करून दिलं. आपल्या मुलीला तिनेदिलं नाही. तिला चांगल्या घरात दिलं आहे. त्याची मोठी शेतीवाडी आहे. ती दिसायला फारच सुंदर होती. तिला खूप ठिकाणांहून लग्नासाठीमागणी येत होती. गावात तशी त्याची दोन-चार घरं होती. म्हातारीचा नवरा सुतारकाम करायचा. मुलगी आईच्या पोटात असतानाच त्याचंनिधन झालं. त्या काळी गावात ताबडतोब उपचार होत नव्हते. पावसाळ्याचे दिवस होते. नदीला पूर आला की संपर्कच तुटायचा. गावातील तो चांगला कारागीर होता. बैलगाडी तयार करण्यातत्याचा हातखंडा होता. त्यातूनही शर्यतीची बैलगाडी त्याच्याशिवाय कोणी बनवीत नव्हता. त्याला लाकडाची फारच चांगली पारख होती. खूप लांबून सागवान आणायचा. त्याचं एक वैशिष्ट्यहोतं. तो फार काम घेत नसे. खूप मेहनत घेऊन बैलगाडी तयार करायचा. त्यासाठी त्याला खूप वेळ खर्च करायला लागायचा. त्याला मिळणारे पैसे आणि त्याला लागणारा वेळ याचं गणित बसायचं नाही. त्याची त्याला पर्वा नव्हती. त्याच्या मनासारखी जोवर बैलगाडी तयार होत नाही तोवर तो विकायचा नाही. त्याच्यापेक्षाकिरकोळ औजारांची दुरुस्ती करणारे जादा कमाई करीत होते. पूर्वी तर पैशाचा व्यवहार नव्हता. धान्यच मिळत होतं. पोटापुरतं मिळालं की त्यांना समाधान होतं. असा हा अचानक वारला. काय झालं त्याचं निदान काही झालं नाही. त्याच्या बायकोला माहेरी तसा आधार नव्हता. गावातील लोकांनी तिला आधार दिला. मुलीला कळू लागल्यावर तिने सुइणीचं काम सुरू केलं. तिची आई हे काम करीत होती. आईकडून तिला ही कला मिळाली नाही. गावालाही अशा एका सुइणीची गरज होती. त्या काळी आजच्यासारखे दवाखाने निघाले नव्हते. घरीच बाळंतपणं होत असत. गावातील बहुतांश बाळंतपणं तिने केली आहेत. गेली तीस-चाळीस वर्षं तरी हे काम ती करीत होती. तिला नवरा मेल्यावर आधार मिळाला. तिची एवढी प्रसिद्धीझाली. एखादं मूल जर आडवं आलं तर बाई बाळंतपणातच मरत होती. अशा अवघड प्रसंगीही तिने सुखरूप बाळंतपणं केली आहेत. गावातील मुलगी बाळंतपणासाठी तिच्यामुळं बाळंत होण्यास गावातच माहेरी येत होती. हातामध्येकला असल्याने तिला काही कमी पडलं नाही. मुलीचं लग्न तर गावानं पुढाकार घेऊनच केलं. आपली दीड एकर शेती तिने आपल्या भावकीतील मुलाला बक्षीस दिली. मुलीनेही तक्रार केली नाही. गावातील लोक तिला म्हणत होते, जोवर जिवंत आहेस तोवर तुझ्या नावावर असू द्या. तीबोलली, माझ्या डोळ्यांदेखत दिलं पाहिजे.आपला नवरा मेल्यावर ती दुःख करीत बसली नाही.कामातच तिचा वेळ जात होता. प्रत्येक घरातील बाळंतपणं तिने केली होती. त्यामुळं कुठल्याघरात ती परकी नव्हती. तिच्याविषयी सगळ्यांनाच आदर होता. तिच्या मुलीला वाटायचं, आपल्या आईला आपल्याकडे कायमच घेऊनजावं. ती कधीच आपल्या जावयांकडे गेली नाही. तेच तिला भेटायला यायचे. तिला काहीच कमी पडलं नाही. तिला भरपूर मिळत होतं. आपल्याला मिळालेला काही हिस्सा ती गावातील गरिबांना देऊन टाकायची. तिने साठा करून ठेवला नाही.म्हातारी आता थकली आहे. आता ती बाळंतपणंही करीत नाही. मुलगीही वारली आहे. ज्यांना तिनेशेती दिली तेही लक्ष देत नाहीत. सगळेच काही असे नाहीत. काहींना अजून जाण आहे. एक खंत आहे, तिनं जे केलं तेवढं प्रेम राहिलं नाही. आता पूर्वीपेक्षा गावात समृद्धी आली आहे. लोक हळहळतात. पुढे फार कमी होतात. तिला काय वाटत असेल, हा विचार आज कोणाच्याही मनात येतनाही.
No comments:
Post a Comment