Tuesday, 31 December 2013

कोको उत्पादनातील मुंग्यांच्या भूमिकेचा झाला अभ्यास

इंडोनेशियामध्ये कोकोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या कोकोच्या फळांच्यागोडव्यामुळे मुंग्या आकर्षित होतात. अनेक वेळा शेतकरी या मुंग्यांना हानिकारक मानून निर्मूलनासाठी प्रयत्न करतात. मात्र यातील स्थानिक मुंग्या कोको फळांच्या उत्पादनवाढीसाठी उपयुक्त असून, परदेशी मुंग्या फायटोप्थोरा बुरशीच्या प्रसारातून उत्पादन कमी करत असल्याचे दिसून आले आहे. अभ्यासाचे हे निष्कर्ष"प्रोसिडिंग्ज ऑफ दी रॉयल सोसायटी बी'मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.स्थानिक मुंग्यांचा फायदा ः- इंडोनेशियामध्ये जर्मनी, इंडोनेशिया आणि स्वीडन येथील संशोधक मुंग्यांच्या समुदायाचे कोको उत्पादनातील नेमके कार्य आणि महत्त्व जाणण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून संशोधन करीत आहेत.- जर्मनीच्या गोटिंगन विद्यापीठातील संशोधक अर्नो विलगोसस यांनी सांगितले, की मुंग्या आणि मिलिबग (पिठ्या ढेकूण) या किडीची सहजीवी भागीदारी असते. मिलिबग वनस्पतींचा रस व अन्नद्रव्ये शोषतात, त्यातील शर्करा काही प्रमाणात मुंग्यांना उपलब्ध होते. हे जरी खरे असले तरी तुलनेने फळांना अधिक हानी पोचवणाऱ्या (फळे पोखरणाऱ्या अळ्या आणि हेलोपेल्टिंस बग यासारख्या) अन्य किडींपासून स्थानिक मुंग्या कोको फळांचे रक्षण करतात.- त्यांच्या प्राथमिक निष्कर्षानुसार, स्थानिक मुंग्या (Dolichoderus) कोको झाडावर नसल्यास उत्पादनामध्ये 27 टक्के घट होत असल्याचे दिसून आले आहे.- मुंग्यांसाठी वापरलेल्या कीडनाशकांमुळे स्थानिक जातींच्या मुंग्यांचे प्रमाण कमी होऊन त्याचा फटका उत्पादनावर होतो.परदेशी मुंग्या ठरतात रोगवाहक- फिलिड्रिस या परदेशी मुंग्या फायटोप्थोराआणि अन्य रोगांच्या बुरशींचा प्रसार करण्यात मोठी भूमिका निभावतात. या मुंग्या फायटोप्थोरा रोगाने ग्रस्त असलेल्या कोको फळांच्या मिलिबगवर संरक्षक थर बनवितात. त्यातून या रोगांचा नव्या कोको फळांवर प्रसार होतो. फिलिड्रिस मुंग्या तंबूसारखी संरक्षक कवचाखाली राहत असल्याने कीडनाशकांपासून त्यांचा बचाव होतो.- या प्रयोगामध्ये परदेशी फिलिड्रिस मुंग्या (Philidris) कोको झाडावर सोडून त्यांच्या सान्निध्याचे परिणाम तपासण्यात आले. त्यामध्ये कोको उत्पादनात 34 टक्के घट आढळली.मुंग्यांच्या सरसकट नियंत्रणाची भूमिका चुकीचीइंडोनेशिया हा जगातील तिसरा मोठा कोको उत्पादक देश आहे. किडी आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे कोकोच्या उत्पादनामध्येमागील वर्षी मोठी घट आली होती आणि त्यामध्ये रोगांच्या प्रसारामध्ये मुंग्यांचा हातभार मोठा असल्याची शेतकऱ्यांची भावना होती. त्यामुळे स्थानिक मुंग्या आणि परदेशी मुंग्या असा भेद न करता मुंग्यांच्या नियंत्रणासाठी शेतकरी प्रयत्नशील होते. मात्र आता या संशोधनामुळेनियंत्रण पद्धतीमध्ये मुंग्यांच्या जातीचा भेद लक्षात घेणे आवश्यक ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Total Pageviews