गूगल इंडियाने सरत्या वर्षात सर्वात जास्त सर्च केलं जाणाऱ्या व्यक्तींच्या नावाची घोषणा केली आहे. या सर्च इंजिन कंपनीचे आकडे आश्चर्यकारक आहेत.गूगल इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असो वा बॉलिवूड किंग शाहरुख खान, दबंग सलमान खान किंवा सध्याच्या तरुणांची ड्रीम गर्ल कतरिना कैफ, गूगलमध्ये सर्वात जास्त सर्च केल्या जाण्याच्याबाबतीत हे सगळे जण अभिनेत्री सनी लिऑनपेक्षा पिछाडीवर आहे.गूगल इंडियाच्या आकड्यांनुसार, शाहरुख खान पाचव्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर सिंगर हनी सिंग सहाव्या, तेलगू आणि तामीळ तसंच हिंदी सिनेमातील अभिनेत्री काजल अग्रवाल सातव्या, बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आठव्या, सचिन तेंडुलकर नवव्या आणि पूनम पांडे दहाव्या क्रमांकावर आहे.कंपनीने आपलं वार्षिक सर्वेक्षण गूगल इंडिया झेईटजीस्टमध्ये हा निष्कर्ष काढला आहे. हे सर्वेक्षण देशात वर्षभरात गूगलवरीलसर्च तसंच ट्रेंडवर आधारित आहे.ट्रेंडिग चार्टमध्ये बॉलिवूड हिट तसंच इंडियन प्रीमिअर लीगचा जलवा पाहायला मिळाला.बातम्यांच्या श्रेणीमध्ये भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींबाबत सर्वात जास्त सर्च करण्यात आलं. त्यानंतर ब्लॅकबेरी फोन, राहुल द्रविड, सायना नेहवाल तसंच विजय माल्या यांचा नंबर होता.
No comments:
Post a Comment