Wednesday, 18 December 2013

असा उतरवा पिकाचा विमा

पावसाचा लहरीपणा तर कधी नैसर्गिक आपत्ती, कीड रोगाचा धुमाकूळ तर बदलतं हवामान याचा फटका पिकांना नेहमीच बसत असतो. यामुळे शेतकऱ्यांचं फारच नुकसान होतं. पण आपल्या पिकाच्या नुकसान भरपाईसाठी आधीच तरतूद केली तर शेतकऱ्यांना काही अंशी पिकांना संरक्षण देणं शक्य आहे. त्यासाठीच योग्य वेळी पिकाचा विमा उतरवण्याची गरज आहे.राष्ट्रीय कृषी विमा योजना खरीप हंगाम २०११योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा उतरवणे सहज शक्य आहे. या पीक विमा योजनेमध्ये कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येतं. या हंगामातील पीक विमा भरण्याची अंतिम तारीख  ३१ जुले २०११ ही आहे.या योजनेत सहभाग घेणारया शेतकऱ्यांची अल्प भू-धारक शेतकरी आणि बहु भूधारक शेतकरी अशा दोन भागांमध्ये विभागणी होते. अल्प भू-धारक शेतकरी हा दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेला शेतकरी गृहीत धरला जातो तर दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेला शेतकरी हा बहु भू-धारक गृहीत धरण्यात आला आहे. या दोन्ही शेतकऱ्यांना पीक विमा उतरवताना वेगवेगळे नॉर्म्स आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांनी विमा उतरवण्याआधी आपण अल्प भू-धारक आहोत की बहु भू-धारक हे लक्षात घेणे गरजेचं आहेशेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव तयार करताना राष्ट्रीय कृषी विमा योजनेच्या नवीन नमुन्यात संपूर्ण भरून देणे आवश्यक आहे. या वेळी हा फॉर्म भरते वेळी पहिले एक ते चार कॉलम हे तलाठ्यानेच भरणे आवश्यक आहेत. या फॉर्मसोबत तलाठ्याचे पेरणी प्रमाणपत्र जोडावे. या प्रमाणपत्रावर पिकाचा प्रकार, गट नंबर आणि त्या पिकाचे क्षेत्र बिनचूक भले गेले आहे का याची तपासणी करावी. या सोबतच आठ "अ"चा उतारा सोबत जोडणं आवश्यक आहे. विमा प्रस्तावासोबत केवळ दोनच कागद पत्र लागतात. विमा प्रस्तावच फॉर्म हा कृषी सहाय्यकामार्फतच भरून घ्यावा.शेतकऱ्यांनी आपला विमा दाखल करण्यापूर्वी बँकेत बचत खाते उघडणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा बँकेने दिलेल्या सवलतीनुसार विमा धारकाचे पंचवीस रुपये भरून खाते उघडता येते. या वेळी शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव हा तलाठ्याच्या शिक्का आणि सही घेणं आवश्यकआहे. या फॉर्मसोबतच विमा फी आकारणी फॉर्म देण्यात येतो. यात पिकाचा प्रकार, विम्याची संरक्षित रक्कम, विमा फी हे रकाने बघूनच बँकेत विम्याच्या हफ्त्यापोटी पैसे भरावेत.विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी वेगवेगळे निकष लावण्यात आलेले आहेत. तालुक्यांनुसार पिकाचा समावेश केलेला आहे. त्यामुळेच विमा उतरवताना आपण भरत असलेल्या पिकाचा समावेश त्या तालुक्यातील पिकात आहे का नाही याची खात्रीकरून घेणं आवश्यक आहेकर्जदार आणि बिगर कर्जदार यांच्यासाठी फी आकारणी तपशील हा एकसारखाच असतो. पीक विमा योजनेत विमा भरणाऱ्या कर्जदार शेतकऱ्याला वितरण केलेल्या पीक कर्जाच्या शंभर टक्क्यांपर्यंत विमा संरक्षण मिळू शकेल. तालुक्यातील कोणत्या महसूल मंडळात कोणत्यापिकास संरक्षण प्राप्त राहणार आहे. ऊस या पिकास विमा संरक्षण लागू नसून त्यासंबंधी शेतकऱ्यांनी पिकाची माहिती घेऊनच ही प्रक्रिया पूर्ण करवणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Total Pageviews