Wednesday 5 April 2023

पन्नासीनंतरचा उत्तम व्यायाम कोणता?

पन्नाशी नंतर प्रत्येकाने ( स्त्री / पुरुष दोघांनी ही ) पुढील उपक्रम हाती घ्यावा….

आपल्या मनाला कठोर पणे बजावत रात्रीचे जेवण हे जमेल तितके लवकर उरकावे …!!

जेवणात तीनच पदार्थ आणि मर्यादित स्वरूपात असावेत…!! ( वात मर्यादेत राहण्या साठी ) आणि हे जर साधारण 15 दिवस सलग, एक ही दिवस न चुकता जमले तरच व्यायामाला सुरुवात करावी म्हणजे दम लागणे, स्नायूंचे आखडणे, मान खांदे दुखणे, पायात गोळे येणे हे उद्भवणार नाही …..!!

आता प्रत्यक्ष व्यायामाला सुरुवात करण्या आधी सकाळी लवकर उठून (साधारण सहा वाजता) आठ दिवस दिर्घ श्वसन करावे …!! साधारण 15 मिनिटे …!! मग पाच दहा मिनिटे थांबून आपण पुर्वी शाळेत जे सामुदायिक व्यायाम प्रकार करायचो ते करावेत …..!! यात कदम ताल , हात सरळ ठेवत वर आणि बाजूला करणे इ.

आता हे सारे नियमित पणे , अजिबात खंड न पडता जर जमले तर मग आपल्या कडील सर्व श्रेष्ठ व्यायाम " सूर्य नमस्कार " हे सुरु करावेत..सुरुवातीला थोडे चुकले तरी चालेल पण हा व्यायाम सोडायचा नाही हे लक्षात ठेवावे …..!!

साधारण सहा महिन्यात आपल्या स्वत: लाच आणि इतरांना ही आपल्या शरीरात झालेला फरक जाणवेल …..!!

अशा प्रकारे टप्प्या टप्प्याने व्यायाम केल्यास आपल्याला कोणताही त्रास न होता याचे सारे फायदे मात्र नक्की मिळतात हा माझा अनुभव आहे….!!

No comments:

Post a Comment

Total Pageviews