Wednesday 5 April 2023

माळकरी बुवा अक्खे मसूरची भाजी का खात नाही?

मसूर हे एक कडधान्य आहे , याचे मुळ हिंदुकुश किंवा इराण असावे असे मराठी विश्वकोश सांगतो

बायबल , तसेच चरकसंहिता , सुश्रुतसंहिता आणी कौटलीय अर्थशास्रात पण मसूराचा उल्लेख आहे

माळकरी लोकांनी मसूर न खाण्याची खालील कारणे मला सापडली

धर्मशास्राप्रमाणे मसूर हे कांदा व लसणाप्रमाणे तामसी प्रकारात मोडते , याने कामवासना आणी राग वाढतो असा संकेत आहे

जमदग्नि ऋषींकडे असलेली कामधेनु जेंव्हा सहस्रार्जुनाने पळवुन न्यायचा प्रयत्न केला , तेंव्हा झालेल्या लढाईत कामधेनुला बाण लागले आणी तीचे रक्त जमिनीवर जेथे सांडले तेथे मसुराचे रोपटे उगवले म्हणुन हिंदु धर्मात एकुणच मसूर अप्रिय आहे , अशीपण एक कथा मला मिळाली

मसूरात प्रथिने भरपुर असतात , इराणमधे मुळस्थान असलेल्या मसूराकडे मुसलमानांची डाळ म्हणुन पण बघीतले जाते म्हणुन हिंदुंनी ती खाऊ नये असा पण एक समज मला मी दोन वर्षे उत्तराखंडला होतो तेथे बघायला मिळाला कारण तेथे ढाबा संस्कृती असुनही मसूर कुठेही मिळत नाही

No comments:

Post a Comment

Total Pageviews