Wednesday 5 April 2023

बायको पेक्षा मेहुणी देखणी असेल तर काय करावे?

खाण तशी माती " अशी म्हण आहे. एकाच आईच्या कुशीत जन्माला आलेल्या मुलींपैकी एक तुम्हाला मिळाली आणि ती तुम्हाला आवडली म्हणून तुम्ही तिच्यावर शिक्कामोर्तब केला.तेव्हा मेहुणी लहान असेल म्हणून नजरेत भरली नसेल पण आता ती सुंदर दिसते तर तिचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा.

देखणे, आकर्षक, लोभस व्यक्तिमत्त्व कोणालाही आवडते त्यात काहीच नवल नाही. ऐश्वर्या जगभरात सगळ्यांना आवडली एकाच्या तर अगदी जवळ असताना दुसऱ्याची झाली. दुसरे उदाहरण घ्या. प्रेमाचा सिलसिला रेखा बरोबर असताना अमिताभ ला जया बरोबर संसार थाटावा लागला, हे होतच असते.

सगळ्या सुखावर पाय देउन मृगजळाच्या मागे धावणारा शहाणा असुच शकत नाही. एका मिठाईच्या दुकानातून गोल आकाराचे गुलाबजाम घेतले पुढे गेल्यावर दुसरया दुकानात लांबट आकाराचे गुलाबजाम दिसले ते पण हवेत, हा तर हावरटपणा झाला. आकारात बदल दुसरे काहीनाही, गोडी तीच असेल.

दोन सख्या बहीणी असल्यामुळे इतका फरक नसेल कदाचित उंची, जाडी उन्नीस बीस असेल घ्या अँडजस्ट करुन.बहुतेक जमेल.

No comments:

Post a Comment

Total Pageviews