Thursday, 19 December 2013

गांधींजीच्या शिकवणीचा खरा पाईक हरपला

दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांचं निधन झालं... नेल्सन मंडेला 95 वर्षांचे होते.. गेलं वर्षभर त्यांना फुफ्फुसाचा त्रास होता.. मंडेलांनी जोहान्सबर्गमधल्या राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला..दक्षिण अफ्रिकेत बोकाळलेल्या वर्णभेदाविरोधात नेल्सेन मंडेलांनी जवळ जवळ चार दशकं लढा दिला. त्यासाठी त्यांनी 27वर्ष तुरूंगवासही भोगला. मुख्य म्हणजे महात्मा गांधींनी दाखवलेल्या अहिंसेच्या मार्गाचा वापर करून मंडलेंनी वर्णभेदाविरोधातली लढाई जिंकली...विसाव्या शतकात जगात शीत युद्धाचे वारे वाहत असताना आणि प्रत्यक्ष गांधींजी हयात नसताना त्यांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाचा वापर करून मंडेलांनी उभारलेला लढा जगात अनेकांना प्रेरणा देऊन गेला.नेल्सन मंडेला यांच्या निधनावर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी दु:ख व्यक्त केलंय.. त्यांना 1993 साली नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

No comments:

Post a Comment

Total Pageviews