Sunday, 7 July 2013

कोकण

चतु:सीमा-सामान्यतः दमणगंगानदीच्या दक्षिणेकडील व सह्याद्रीच्या पश्चिमेकडील खालील चतु:सीमेचाजो प्रदेश तो कोंकण होय. पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस सह्याद्री,उत्तरेस दमण व दक्षिणेस गोव्याच्यासरहद्दीवरील तेरेखोलपर्यंतचा प्रदेश अशी याची चतु:सीमा आहे. डफने तापी नदी ते सदाशिवागड अशी याची उत्तर-दक्षिण सरहद्द दिली असून या भागास त्याने थळ कोंकण असेही म्हटले आहे. कोकणात हल्ली मुंबई शहर, ठाणे, कुलाबा, रत्नागिरीहे जिल्हे, उत्तर कानड्याची पट्टी, जंजिरा व सावंतवाडी ही संस्थानें व गोवे प्रांत इतक्यांचा समावेश होतो. या प्रदेशाची रुंदी साधारण २५।३० वमैल लांबी सुमारे ३२० मैल असून, लोकसंख्या जवळजवळ ५७ लाख आहे.प्राचीन उल्लेख— कोंकण हा शब्द फार प्राचीन आहे. परंतु वरील भूप्रदेशाला हे नाव का व कसे देण्यात आले याचा समाधानकारकउलगडा अद्याप झालेला नाही. निरनिराळ्या काळी कोंकणच्या मर्यादा बर्याच भिन्न असाव्यात असे उपलब्ध झालेल्या तत्कालीन उल्लेखांवरून दिसते, महाभारतात (भी. प.अ.९) अपरान्त व कोंकण ही दोन्ही नावे आली आहेत. हरिवंश व विष्णुपुराण आणि वराहमिहिर यांनीही कोंकणचा नामनिर्देशकेला आहे. अपरातांतीलशूर्पारक हे शहर फार जुने असून बौद्ध वाङ्मयांत त्याचा अनेकदा प्रामुख्याने उल्लेख येतो. शूर्पारक म्हणजे हल्लीचे सोपारे (ठाणे जिल्हा, वसईजवळ बी.बी.सी.आय. रेल्वेचे स्टेशन) असून येथे थोड्या वर्षांपूर्वी बुद्धाचा एक स्तूप व अशोकाची धर्मशासनांकीत एक लेखशिला सापडली होती. महाभारतात शांतिपर्वाच्या ४९ व्या अध्यायात या शूर्पारकाचा उल्लेख आहे; तसेच सहदेवाच्यादक्षिण विजयात कोंकण देशाचे नावआले आहे. बृहतसंहितेत (१४.१२) देखील दक्षिण विभागांतीलदेशात याची गणना असून एके ठिकाणी तर 'सप्तकोंकण' असाहि याचा उल्लेख आला आहे. दशकुमार चरित्रांत कोंकण असा शब्द आला आहे. ख्रि.पू. तिसर्या शतकात यास अपरांत म्हणत; रघुवंशात अपरांत हेच नाव आहे. संस्कृत वाङ्मयात त्रिंबक ते कन्याकुमारीपर्यंतच्या पश्चिमकिनार्यावरील प्रदेशात कोंकण हे नाव येते. 'अपरान्त' याची व्युत्पत्ती कांही जण पुढीलप्रमाणे देतात :- अपरा म्हणजे पश्चिमदिशा, तिचा जेथे अंत होतो (म्हणजे पुढे समुद्र लागतो) तो प्रदेश. परंतु काहींचेम्हणणे की सोप्पार (सोपारे) प्रांताचा अंत या शब्दावरून 'अपरांत' शब्द झाला असावा. 'महावंशो' या बौद्ध ग्रंथांत सोपार्याच्या दक्षिणेकडील देशास अपरांत म्हटले आहे व अशोकाने तेथें आपले धर्मप्रचारक पाठविल्याचाही निर्देश केला आहे. राजतरंगिणीत व चालुक्याच्या शिलाशासनातवरील सप्तकोंकणहा शब्द आलेला आहे. ख्रि.पू. चौथ्या शतकात कोंकण हे नाव प्रसिद्ध झाले होते. रा. रा. भागवत यांनी या शब्दाची व्युत्पत्ती अशी दिली होती की, चेर देशास काग किंवा कोंग (कोंगु?) असे म्हणण्याचीबरीच जुनी वहिवाट आहे. कांग आणि गंग हे दोन्ही शब्द एकार्थी आहेत व ते एका राजघराण्याचेंही नाव आहे. यावरून कोंगवत हा शब्द तयार झाला असावा व कोंगवत याचा कोंकण शब्द बनला असावा. (वि.ज्ञा. वि.पु. २२ पृ. ९९).  कालिदास आणि भारवी यांच्या कोंकणवर्णनांत थोडासा फरक आहे. शके ४२६ मधील पंचसिद्धांतिका या ग्रंथांत कोंकण हा शब्द आला आहे. इ.स. ८० मधील पेरिप्लसच्या कर्त्याने कोंकणाचा व झिनोल (चौल बंदर)चा उल्लेख केला आहे. कदंबराजवंशाच्या लेखावरून ख्रि.श. पूर्वी बौद्धधर्मप्रसारकांचेपाय कोंकणास लागल्याचे स्पष्ट होते.ख्रि.पू. १ ल्या शतकात मलबारावर सत्ता गाजविणार्या पेरमाल राजांची एक मोठी सभा कोंकणांत भरल्याचा उल्लेख आढळतो. रेवदंड्याबद्दल एक दंतकथा अशी सांगतात की, श्रीकृष्णाने (आपली भावजय जी रेवती हिला निर्वाहार्थ रेवतीक्षेत्र म्हणून जी भूमी दिली होती, तेंच हल्लीचे रेवदंडा होय. (वि.ज्ञा.वि.पु. २१ अं. १-२). टॉलेमीने कोंकणाचा निर्देश लारिका (लाटदेश (सं.) = गुजराथ व उत्तर कोंकण) व आरिका (दक्षिण कोंकण) असा केला आहे. (इ.स. १५०). पेरिप्लसमध्ये लारिकावे नाव नसून बरुगझ (भरुकच्छ = भडोच) हे नाव येते व आरिका देशांत चांचे लोकांचा फार उपसर्ग होता असे त्यांत म्हटले आहे, हे चाचे म्हणजे अरब लोक होत. या चांच्यांचाउल्लेख स्ट्रॅबोनेही केला आहे. तत्कालीन कल्लिएन म्हणजे हल्लीचे कल्याण (जी.आय.पी.रेलवेचें स्टेशन) व सेसेक्रिएनीम्हणजे वेंगुर्ला होय असें स्मिथ म्हणतो (स्मिथ. पु. २. ४२२); पैकीं कल्याण हें नांव बरोबर आहे; सेसेक्रिएनी म्हणजे वेंगुर्ला हे संशयित दिसते. या दोन बंदरांच्यादरम्यान टॉलेमी व पेरिप्लस पुढील गांवें देतात :- ओपार (सोपारे), सेमुल्ल (चेऊल ?), मंदगोर, पलपोटम किंवा बलपाटण,मेलिझिगर व तोपरोन. टॉलेमीने ओपार व सेमुल्ल यांच्यांत बिंद ही नदी दिली आहे, प्लेनीचे झिझेरस व टॉलेमीचे मेलिझिगर हे सुवर्णदुर्ग किंवा जयगड असावे असे लासेन व स्मिथ म्हणतात. (झिझरेस या शब्दाचें जंजिरा या शब्दाशी बरेचसे साम्य आहे.) प्लिनीचे बायझँटियम हे विजयदुर्ग व निट्रिअस हे (मालवण व वेंगुर्ले यांच्यामधील) निवतीहोय असे रेनेल म्हणतो (व्हिन्सेन्ट पु. २). पेरिप्लस व टॉलेमीची तत्कालीन ग्रामनामे हल्ली स्पष्ट ओळखता येत नाहीत; याचे करण ती हल्ली नष्ट झाली असून नवीनच बंदरे पुढे आली आहेत.ख्रि.पू. तिसर्या शतकांत अशोकाने आपले प्रेषित बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अपरांतात पाठविल्याचा उल्लेख, त्याच्या गिरनार खालशी व शहाबाजगढी येथील शिलालेखात आढळतो. यावरून ख्रि.पू. दुसर्या व तिसर्या शतकात अपरांत मौर्यांच्या ताब्यात होते व त्या काळी शूर्पारक ही त्यांची राजधानी होती असे ठरते. बायबलातील ऑफीर हेंच सोपारा होय, असे काहींचे म्हणणे आहे. अलबेरूणीनेसमुद्राजवळील कोंकणअसा कोंकणाचा निर्देश केला आहे.भूप्रदेश:- सामान्यतःकिनार्याजवळचे प्रदेश सुपीक, बर्याच लागवडीचे व दाट वस्तीचे असून किनार्यापासून लांबचे प्रदेश खडकाळ रुक्ष असे आहेत. येथील हवाथंड असून पाऊस फार पडतो. उष्ण वारे क्वचित् वाहतात. हवेत घडोघडी फेरफार होत नाहीत, ती सामान्यत निरोगी असते. मुंबईच्या उत्तरेस किनारा सखल ववालुकामय असून नद्या उथळ व बंदरे कमी महत्त्वाचीअशी आहेत. मुंबईच्या दक्षिणेकडील किनारा चांगला असून त्याच्या बाजूने टेकड्यांच्या रांगा आहेत. तसेच या भागात पुष्कळ नद्या व मोठी बंदरेही आहेत. जमिनीपासूनपाव मैलाच्या आत दर्यामध्येअर्नाळा, कुलाबा, दांडाराजापूर व सुवर्णदुर्ग यासारखी लहान लहान खडकाळ बेटे असल्याने, त्यावर मराठी साम्राज्यात किल्ले बांधले गेले व त्यामुळे त्यांना महत्त्व आले. उत्तर कोंकणात वस्ती पातळ असून दक्षिणकोकणात मात्र दाट आहे. दक्षिण कोंकणातली जमीन सामान्यतः खडकाळ व नापीक आहे, परंतु तीत नद्या व खाड्या पुष्कळ असल्यानेत्यांच्या काठचा प्रदेश सुपीक आहे. उत्तरकोंकणात झाडी बरीच असून त्यांत ताड व खजूर पुष्कळ आहेत. दक्षिण कोंकणात फारशी झाडी नाहीं, येथें ताडाऐवजीं नारळाचीं झाडें पुष्कळ आहेत.  खेड्यांतीललोकांनां या नारळींच्याबागांपासूनबरेच उत्पन्न मिळते. सह्याद्रीमुळें पावसाचे वारे अडले जाऊन  कोकणांत पाऊस फार पडतो, म्हणून तेथें अवर्षण व दुष्काळ यांची भीती कधी नसते. मुख्य पीक तांदूळहें असून नागली, वरी, वाल वगैरे धान्य साधारण प्रमाणांत होतें. नारळ, सुपारी, कलमी आंबे, काजू, कोकंबा, फणस वगैरे फळे व सर्वसाधारणशाकभाज्या उत्पन्न होतात. माशांचा व्यापार बराच चालतो. वाघ, चित्ते, सर्प हे प्राणी फार आहेत. पर्वताच्यापायथ्याशी मलेरियाचा रोग विशेष जाणवतो. खनिज संपत्ती बहुतकरून मुळीच नाही.लोक— मुख्यतः महाराष्ट्रीय लोकांचीच वस्ती जास्त आहे. उत्तर कोंकणात गुजराथी व तत्सम लोक आणि मूळचे लोक थोडेफार आहेत.मात्र दक्षिण कोंकणात शुद्ध महाराष्ट्रीय आहेत. कोंकणातील बहुतेक लोक शेती करतात. इंग्रजी राज्य सुरू होण्यापूर्वी पुष्कळ लोक (मुख्यत्वें मराठा, भंडारी, कुणबी व थोडेफार ब्राह्मणही) लष्करी पेशा स्वीकारीत असत. हल्ली थोडेफार कोंकणी मराठे लष्करात दाखल होतात. अलीकडे या १५।२० वर्षांत मुंबईस गिरण्यांत मजूर म्हणून या कोंकणी (बालू) लोकांची भरती सपाटून होऊ लागली आहे. कोंकणी लोक पोटाकरिता घर सोडून बरेच दूरवर जातात खरे. परंतु म्हातारपणीते घरी येतात. इकडील गावे फार लहान लहान असतात; मोठ्या गांवची लोकसंख्या १५ हजारांच्यावर क्वचितच जाते. किनारा विस्तृत व बंदरे सोयीची असल्याने पूर्वी दूरदूरचे परदेशी लोक येथे उतरत असत. अरबस्तानापासून कोंकण जवळ असल्याने प्रथम अरबांचा उपसर्ग कोंकणास झाला. प्रदेश सुपीक असल्याने या प्रांताला महत्त्वही चढले. बौद्धांनी व पुढे ब्राह्मणांनी आपापले मठ साष्टी येथे स्थापून इतरत्र लेणी कोरली होती. पूर्वी येथे आलेले फारशी, ज्यू, हबशी व अरब यांचे वंशज अध्यापिही आढळतात. यापैकीं बेनेइस्रायल व पारशी यांचे आगमन कोंकणच्या इतिहासात महत्त्वाचें गणलें जाते. बेनेइस्रायल हे बहुतेक उत्तरकोंकणात राहतात. पारशांनी व्यापारात बराच पुढाकार मिळविला असून ते बहुतेक सारे श्रीमंत आहेत. पंधराव्या शतकांतपोर्तुगीज येथे येऊन त्यांनी चौल, वसई वगैरे ठाणी घेऊन आपले पाय पसरले. सोळाव्या शतकात त्यांनी वरीलप्रमाणे अंमल पसरवून हिंदू लोकांवर धार्मिक बाबतीत अतिशय जुलूम केला. अठराव्या शतकात आंग्र्यांनी यांचा व इंग्रज आणि डच यांचा पुरता नक्षा उतरविला. त्यांनी सतराव्या शतकात येथे आपल्या वखारी घातल्या होत्या व मराठी राज्यांत व्यापाराच्या सवलती मिळविल्या होत्या. मराठी साम्राज्यांत तर कोंकण किनार्याचे महत्त्व फारच वाढले होते. इंग्रजी राज्य आल्यानंतर ते हळूहळू कमी होत चालले व बंदरांचे व किल्ल्यांचे अस्तित्व नाममात्र भासूं लागले आणि व्यापारी बसत चालला. ठाणे जिल्ह्यात तेवढी आगगाडी सुरू आहे. कोंकण व देश यांत सह्याद्रीची प्रचंड भिंत असल्याने (जरी मधून मधून  पुष्कळसे घाट व वार्या जाण्यायेण्यास आहेत तरी) परस्परांत व्यापार जोरात चालू नाही; त्यामुळे कोंकण हे खालावलेले व दरिद्री झाले आहे. फक्त तेथें सृष्टीशोभापाहावयास सांपडते व कोंकणी लोक बुद्धीने हुशार असतात एवढाच फरकआहे.प्राचीन व्यापार व दळणवळण— एलफिन्स्टन म्हणतो की भडोच व अरिका येथून आफ्रिकेला पहिल्या शतकाच्या सुमारास तांदूळ व इतर धान्य, लोणी, तिळाचे तेल, जाड व बारीक कपडा, साखर, वगैरे माल रवाना होई. हा व्यापार कच्छी व अरबी लोक करीत. प्राचीन इजिप्शियन लोकांशी हिंदुस्थानचा व्यापार होता. तसेच रोमन लोकांचा व्यापारही अरबांमार्फतहिंदुस्थानशी असे, असे स्मिथ व एलफिन्स्टनम्हणतात. पेरिप्लसचें मुझीरीस (हल्लीचे मंगळूर) हे अशा व्यापारांचे मोठे बंदर होते. याकाळी अरिका हादेश तगरच्या राजांच्या अंमलाखाली होता. तगर म्हणजे हल्लीचे निजामशाहीतील तवरगिरी असे रा. राजवाडे म्हणतात. पेरिप्लसनंतर सहाव्या शतकांत कॉस्मस नांवाच्या ग्रीक व्यापार्यानें तत्कालीन व्यापाराचीमाहिती पुढीलप्रमाणें दिली आहे :- कल्याण हे व्यापाराचें मोठे ठिकाण असून तेथून जहाजें परत जातांना, पितळ,तीळ, लांकूड व कापड हे जिन्नस नेत. सातव्या शतकांत आलेला बौद्धभिक्षु ह्युएनत्संग हा परत जातांना कल्याण किंवा बाणकोट येथें जहाजावर चढला असेंम्हणतात. याने कोंकणपूर या राज्याचा घेर ४०० कोस असून तो प्रदेश पूर्वी कदंबाच्या राज्यात मोडे असे म्हटले आहे. कास्मसच्यानंतर आरबांनीं कोंकणचा उल्लेख केला आहे.  त्यांनी कोंकणाला केमकेम, कोमकम, कंकन, कोंकण वगैरे नांवे दिली आहेत. इब्न बतुता याने कोंकण, ठाणे व एका इटालियन प्रवाशाने कोसिटण म्हटले आहे. इ.स. ६३६ त खलीफ उमर याने ठाण्यास फौज पाठविली होती, असे एक अरब ग्रंथकार म्हणतो. (रीनांड-फ्रॅग्मेंटस्. १८२६) इ.स. ८५१ त एक सुलेमान नावाचा व्यापारी इकडे आला होता. त्याने कोंकण हे बलहारराजांच्या अंमलाखाली असल्याचे नमूद केले आहे, बलहार म्हणजे शिलाहार असावेत. अबुरिहाननेकोंकणची मैदाने दंडका या प्रदेशात दिली आहेत. अलबेरुणी हा कोंकणची राजधानी तालह (तळे?) असल्याचे लिहितो. त्याने भडोच, सिंदन (संजान?) सौबर, टाणा (ठाणे), लारण, दिजमौर, मलाय, कंदजी, द्रवीर वगैरे मोठ्या गावाची व प्रांताची नावे दिली आहेत. यातील अंतरे त्याने परसंग या इराणी मापाने दिली आहेत. (एक परसंग म्हणजे साडेतीन मैलांपेक्षा थोडे अधिक अंतर होय). पुढे स. १३०० च्या सुमारास रशिमुद्दीनहा कोंकण व गुजराथचाउल्लेख, खंबायत, कंकन, टाणा, मलबार या नांवासह करतो. याच्यापूर्वी एक शतक अल् इद्रिसी हा प्रवासी आला होता. त्याने आपले वृत्त असे दिले आहे :- बरूक (भडोच) पासून सिंधापूर हेकिनार्याने चार दिवसांच्यामजलीवर असून तेथून बन (ठाणे?) चारदिवसांच्यावाटेवर आहे. हें एका मोठ्या आखाताच्या किनार्याला असून येथें मोठमोठी गलबते राहूंशकतात. ठाण्याच्याखाडीच्या पूर्व व पश्चिमेकडील टेकड्यांच्या मधील भागांत व ठाणे आणि वसई या दरम्यानच्या प्रदेशावर थोड्या काळापूर्वीपाणी असावे हे लक्ष्यांत घेतल्यास, आठ शतकांपूर्वीच्या ठाण्यासंबंधाची वरील वर्णने चुकीची नसावीत असे वाटते. या अरबप्रवाशांपैकी शेवटचा इब्न बतुता हा होय. त्याने ठाण्याहून मोठमोठी जहाजे व्यापारानिमित्तएडनला जात असत असे म्हटले आहे. मार्कोपोलोया व्हेनिसच्या प्रवाशाने कोंकणचे वर्णन (स. १२९०) दिले आहे; परंतु ते फार संदिग्ध आहे. त्याने कोकणावर त्यावेळी ठाणे व लार (लाट) अशी दोन राज्ये होती असे म्हटले आहे.ठाणे भरभराटीस आल्यावेळी साहजिकच कल्याण मोडकळीस आले. त्यामुळे पुढील प्रवाशांच्या वर्णनांत कल्याण येत नाही. तसेच दाभोळ व चेऊल यांचीही नावे त्यावेळी आढळत नाहीत. कारण ही पोर्तुगीज व मुसुलमानांच्या रियासतीत नांवारूपासचढली.प्राचीन इतिहास:— हा इतिहास शिलालेख ताम्रपटादिसाधनांवरूनदेता येतो. कोंकणात बौद्ध किंवा ब्राह्मणी लेणी व खोदकामे बरीच असून ती पुढील ठिकाणी आहेत : कान्हेरी, कोंदिवटे, जोगेश्वरी,मंडपेश्वर,मागाठण, घारापुरी, करंज, जंब्रुग, कोंडाणे व चंदनसार ही ठाणे जिल्ह्यात असूनपाल व कुडा ही कुलाबा जिल्ह्यात आहेत; आणि रत्नागिरीजिल्ह्यांतचिपळूण, खेड, दाभोळ, संगमेश्वर,गव्हाणे, वेळगांव व वाडेपाडेल ही आहेत. यांत असलेल्या शिलालेखांवरून तत्कालीन पुष्कळमाहिती निघते. कान्हेरी लेण्यांत शिलाहार व आंध्रभृत्यराजांची नावे येतात. ही पुष्कळशी लेणी बौद्धधर्मीयांचीच आहेत. त्यावरून एके काळी साष्टी व मुंबईच्या दक्षिणेकडील काही भागांत बौद्धाचे ठाणे असावे असे दिसते. कोंकणावर निरनिराळ्या काळी निरनिराळे (म्हणजे मौर्य, आंध्र, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, मुसुलमान, पोर्तुगीज व मराठे इ.) राजे झाले. ख्रि.पू. तिसर्या शतकांत अशोक मौर्याचा अंमल होता. सोपारें येथे सापडलेल्यास्तूपात गोतमीपुत्रशातकर्णी याचे एक नाणे आढळलें; सोपारे ही अशोकाची या भागाची राजधानी होती. मौर्याचे राज्य ख्रि.पू. २ र्या शतकांतही होते. पुढे इ.स.च्या पहिल्या शतकात शातवाहनाचेराज्य कोकणावर झाले.हेच आंध्रभृत्यहोत. नाशिक जिल्ह्यातील एका (त्रिरश्मिपर्वताच्या) लेण्यांत पुलुमायी शातवाहनाच्या राज्यविस्तारात अपरांतकाचेनाव आले आहे. हा शातवाहनांचा अंमल बहुधा इ.स. ३ र्या शतकापर्यंतटिकला असावा. यापुढे इ.स.च्या चौथ्या शतकात कलचुरी घराण्याचा अंमल कोंकणावर बसला. या घराण्यातीलकृष्णराज (इ.स. ३७५-४००) याची काही नाणी मुंबई व साष्टीस आढळली. हे घराणे ५ व्या शतकापर्यंतकोंकणचे अधिकारी असावे. तसेच इ.स.च्या ६ व्या शतकापर्यंतमौर्यांचा अंमल इकडे असल्याचाहीपुरावा मिळतो. या वेळी नळ नांवाचे एक घराणेही कोंकणात राज्य करीत होते. सहाव्या शतकात चालुक्य घराण्यांतील कीर्तिवर्मा याने (इ.स. ५६७-५९१) उत्तर कोंकणवर स्वारी करून मौर्यांचा पराभव केला. त्याचा नातू दुसरा पुलकेशी याने (६११-६४०) तर मौर्यांचे उच्चाटण करून कोंकण प्रांत खालसा केला. या मौर्यांची राजधानी पुरी (हल्लीचे घारापुरी किंवा त्याच्या शेजारचे मोरे बंदर असावे) हे शहर होते. ते पुलकेशीच्या चंडदंड या सेनापतीने १०० जहाजांच्याआरमारानिशीलढाई करून काबीज केले. हे चालुक्य उत्तर कोकणावर साधारणतः इ.स. ८१० पर्यंत राज्य करीत असावेत. यापुढे शीलाहारांचा अंमल कोकणावर बसला. वरील चंडदंडाची हकीकत वाडें येथील एका शिलालेखात सापडते. त्यावेळीसुकेतुवर्मा नावाचा मौर्यराजा होता. इ.स. ६३७ च्या सुमारास अरबांनी ठाण्याजवळील कोंकण किनार्यावर चढाई केली होती. शिलाहारराजे हे इ.स. ८१० ते १२६० पर्यंत कोंकणवर अधिकार गाजवीत होते. या अवधीत वीस राजे होऊन गेले. परंतु त्यांचा इतिहास चांगलासा उपलब्ध नाही. यांचीही राजधानी पुरी हे शहर असून संजाण,ठाणे, चौल, लोनाड, सोपारे, चेमुली व उरण ही शहरे राज्यांत प्रमुख होती. म्हणजे हल्लीच्या ठाणे व कुलाबा जिल्ह्यांतील बराच भाग त्यांच्या ताब्यात होता. हे राजे स्वतःस तगरपुराधीश्वर असे बिरुद लावून, जीमूतवाहनाचे वंशजम्हणवीत. यांचा पहिला पुरुष कर्पोद होय; त्याचा मुलगा पुलकेशी. याच्याबद्दल कान्हेरीच्या शिलालेखात "कोंकणातीलमंगलपुरीच अधिपती'' असे म्हटले आहे. तो अमोघ वर्ष राष्ट्रकुटांचा मांडलिक असावा असेही त्या लेखावरून दिसते. कान्हेरी लेण्यातील दुसर्या एका शिलालेखावरून या पुलकेशीचा मुलगा दुसरा कपर्दि (८५३-८०) हा देखील राष्ट्रकुटांचा अंकित होता असे दिसते. या कपर्दीचा नातू झांझ हा सैमूर (चौल?) प्रांताचा राजा असल्याबद्दल समसुदी हा अरब इतिहासकार (इ.स. ९१६) सांगतो; पुढे या झांझचा नातू अपराजित (इ.स. ९२०-९४०) हा मात्र स्वतंत्र बनला. कारण, त्याचा सार्वभौम जो कक्कल राष्ट्रकूटत्याचा वध चालुक्य तैलप याने परभारे केल्यामुळे(भिवंडी तालुक्यातील भेरगांवचा शिलालेख पाहा) यास फावले. त्याचा(अपराजितचा) पुत्र अरिकेसरी (इ.स.९४०-१०१७) हा कोंकणातील १४०० गावांवर राज्य करीत असून, त्यांत पुरी व श्रीस्थानक(ठाणे)ही मुख्य गावे होती असे (स. १०९७ च्या) एका शिलालेखात म्हटले आहे.या घराण्यातील१७ वा राजा (अरिकेसरीचा पणतू) जो दुसरा अपरादित्य त्यांचा नातू) मल्लिकार्जुन (स. ११५६-६०) हा मोठा बढाईखोर असून स्वतःस राजपितामह म्हणवीत असे. त्याच्या एका भाटाने गुजराथच्याकुमारपाल सोळंखी (स. ११४३-७४) राजाच्या देखत मल्लिकार्जुनाला राजपितामह म्हणून त्याची स्तुती केली असता, ती ऐकून त्याने आपला सेनापती आनंद यास मोठ्या सैन्यानिशीमल्लिकार्जुनावर पाठविले. पहिल्या लढाईत आनंदाचापराभव झाला, परंतु दुसरीत त्याने मल्लिकार्जुनास ठार मारिले. याच्या वेळचे दोन शिलालेख (वसई व चिपळूण) उपलब्ध आहेत. कुमारपालाचा अंमल थोडे दिवस ठाणे कोकणावर होता; परंतु पुढे थोड्याच दिवसांत ठाणेकर शिलाहार हे कोल्हापूरकर शिलाहारांच्या मदतीने स्वतंत्रबनले. मल्लिकार्जुनाचा पणतू सोमेश्वर हा या वंशातील शेवटचा- विसावा- पुरुष होय. (स. १२५० ते १२६०). त्याच्यावर१२६० मध्ये महादेव यादव देवगिरीकर याने स्वारी केली; तेव्हा सोमेश्वर हा नौका गमन शास्त्रांतप्रवीण असल्याने, त्यानें दर्याचा आसराधरला; परंतु महादेवानेंही अनेक समुद्रयानेजमा करून त्याचा सर्वस्वी विध्वंस केला. हेमाद्रीनेहे सर्व वर्णन आपल्या 'राज्यप्रशस्तीत' दिले असून सोमेश्वरासकुकुंणेश म्हटले आहे. याप्रमाणे इ.स. १२६० साली कोंकणप्रांत देवगिरीकर प्रौढप्रताप चक्रवर्ती यादवांच्यासाम्राज्याखाली गेला, तो इ.स. १३१८ पर्यंत त्यांच्याकडेच होता. शिलाहारराजे हे आपला राज्यकारभार निरनिराळ्या मंत्र्यांच्या सल्ल्याने चालवीत असत. त्यांना देवालये, तलाव वगैरे बांधण्याचीफार आवड असून ते विद्येचे भोक्ते होते. यादवांनी कोंकणावर राज्य चालविण्यासआपले प्रतिनिधी नेमिले होते; त्यांना सर्वाधिकारी किंवा महाप्रधान म्हणत. अशा प्रकारचा एक अच्युत नायक नांवाचा यजुर्वेदी ब्राह्मण महाप्रधान (गव्हर्नर)इ.स. १२७२ साली कोंकणात कारभार करीत होता. सार्वभौम रामचंद्रदेव यादव याच्या या महाप्रधानांनीदिलेले दोन ताम्रपट (इ.स. १२७३ व इ.स. १२९१ चे) ठाणे जिल्ह्यात सापडले असून, भिवंडी व वसईस खुद्द रामदेवरायाचे शिलालेखही आढळले आहेत. कृष्ण कावळे हा भारद्वाजगोत्री ब्राह्मण महाप्रधान इ.स. १२९० त सर्व कोंकणप्रांतावर राज्य करीत होता. पुढे अल्लाउद्दीन खिलजीनेरामदेवरायावर स्वारी केली असता (इ.स. १२९४)त राजाने वंशरक्षणासाठी आपला दुसरा मुलगा भीमदेव (बिंबदेव) यास त्याच्याबरोबर राजगुरू पुरुषोत्तमपंत कावळे व इतर सरदार दरकदार देऊन उत्तरकोंकणात पाठविले. बिंबाख्यानव कौस्तुभचिंतामणी या ग्रंथावरूनअसे दिसते की भीमदेव हा अनहिलवाड्यावरून जलमार्गानेकोकणात उतरून व कृष्ण कावळ्यापासून सर्वाधिकारहस्तगत करून महिकावती (माहीम) हीआपली राजधानी करून तेथें राहिला. त्याने उत्तर कोंकणचे १५ विभाग केले होते; त्यात १६२४ खेडी होती. भीमदेवाच्या मागून प्रताप देव व त्याच्या मागून नागरदेव हे राजे झाले. नागरदेवाच्या वेळी स. १३४७ त गुजराथच्यामुसुलमान शहाचा सेनापती मलिकनाईक याने एकाएकी नागरदेवावरस्वारी केली; तीत नागरदेव व त्याची राणी मारली जाऊन उत्तरकोंकणमुसुलमानांच्या ताब्यात गेले. दक्षिण कोकणांतील शिलाहारांच्या वंशातदहा राजे होऊन त्यांनी सुमारे इ.स. ८०८ ते १००८ पर्यंत राज्य केले. ते प्रथम राष्ट्रकुटांचे व मग चालुक्यांचे आणि शेवटी देवगिरीकर यादवांचे मांडलिक होते.मुसुलमानी अंमल— मुसुलमान कोंकणात घुसल्याचा पहिला उल्लेख १३१२ तील आहे. त्या वर्षीमलिक काफर याने दाभोळ व चेऊलवर स्वारी केली होती. पुढे इ.स. १३१८ त देवगिरी घेऊन मुबारकशहाने समुद्रकिनार्यावर नवे किल्ले बांधण्याचाप्रारंभ केला; व साष्टी व माहीमचे जुने किल्ले काबीज केले. कोकणात मुसुलमान जाण्यापूर्वी उत्तर कोकणात वसई,कल्याण, कर्नाळा, चौल आणि दक्षिणकोकणात दाभोळ, राजापूर व कुडाळ हे प्रांत मोडत असत. ब्राह्मणी राज्य स्थापन झाल्यानंतर(१३४७) कोंकण त्यांच्या राज्यात समाविष्ट झाले. त्यात चौल व दाभोळ हे दोन निरनिराळे प्रांत होते. याच सुमारास जव्हारचे संस्थान निर्माण होऊन दिल्लीकर मोंगलानें त्याला मान्यता दिली होती. यावेळी म्हणजे १३४७-१४०० पर्यंत जरी कोंकण हे अविंधांच्या सत्तेखाली होतें, तरी तेथें हिंदूंची कित्येक मांडलिक राज्ये होती. त्यापैकी कांही विजयानगरकरांचे व काही गोवळकोंडेकरांचे मांडलिक म्हणवीत. अर्सकिन म्हणतो की, अहंमदशहाने(गुजराथचा शहा) पंधराव्या शतकात बराच कोंकण प्रांत काबीज केला होता. त्यावेळी त्याच्या राज्यात वसई,मुंबई, दमण, दांडाराजापूर हे प्रांत व वसई, आगाशी, दाभोळ, चौल, दांडा, पनवेल, कल्याण, भिवंडी गोंवे ही शहरे प्रमुख होती असे मिरात-ई-अहमदी म्हणते. याच्या कारकीर्दीतमलिक-उल्-तुजार यानेकोंकण लुटले (१४२९). माहीम (मुंबईकडील) व साष्टी ही बेटे घेतली तेव्हां त्याच्यावरवरील अहंमदशहानेखुष्कीने व जलमार्गानेसैन्य पळवून व त्याचा पराभव करून ती परत मिळविली. पुढे १४३६ त व १४५३ त ब्राह्मणी राजांनी कोंकणावर स्वार्या केल्या; त्यापैकी शेवटच्या स्वारीत विशाळगडच्या शिरके या आडनांवाच्या घराण्यांतील एका मराठा सरदाराने आपल्या शंकरराय नावाच्या राजाविरुद्ध मलिक-उल-तुजार यास बोलविले. वास्तविक हे वेबनावाचे सर्व ढोंग असून मुसुलमानांचा नायनाट करण्याकरीता त्यावेळच्या प्रमुख मराठ्यांनीही युक्ती योजिली होती. शिरक्याने मलिकास सह्याद्रीच्या अत्यंत अडचणीच्या जागेत नेऊन सोडल्यानंतर पूर्वी ठरल्याप्रमाणे शंकरराय व इतर मराठे सरदारांनी त्यांच्यावर हल्ला करून त्याचा सपशेल धुव्वा उडविला. या शिरक्यांचीराजधानी प्राचीन काळापासून विशाळगड व भैरवगड येथे असून त्यांच्या ताब्यात (डफच्या मते) पुण्यापासून वारणेपर्यंतचा घाटमाथा व पलीकडील कोंकण होते. वरील प्रसंगानंतर १६ वर्षे मुसुलमान भीतीने कोकणात फिरकले नाहीत. उलट शिरके हे आपल्या आरमाराच्याबळावर त्यांना भेडसावीत होते. पुढे महंमद गवान यानें १४६९ त दाभोळ व चौल येथील सैन्याच्याव आरमाराच्यामदतीने शिरक्यांवरस्वारी केली.परंतु ५ महिने विशाळगडास वेढा देऊनही तो किल्ला पाडाव झाला नाहीं, तेव्हा तो परत फिरला. मात्र दुसर्या वर्षी गवानने विश्वासघाताने विशाळगड घेतला. फेरिस्ता म्हणतो की यापूर्वी हाकिल्ला मुसुलमानांच्या हाती लागला नव्हता. इ.स. १४७८ त दख्खनच्या चार सरकारांचे (प्रांतांचे) आठ सरकार झाले तेव्हां उत्तर कोंकणचा प्रांत जुन्नर सरकारात जोडला गेला. यानंतर लगेच गोव्याच्यासुभेदाराचामुलगा बहादूर गिलाने याने माहीम, साष्टी, दाभोळ, वसई वगैरे कोंकणचा भाग (हा गुजराथच्याशहाचा प्रदेश होता) जिंकला (१४९०). तो एक वर्ष त्याच्या ताब्यात होता. इकडे जुन्नर प्रांताचा सुभेदार अहंमद यानेही कोकणातील बरेच किल्ले सर करून दांडाराजपुरास वेढा दिला. पण तेथें त्याची डाळ शिजली नाही. तिकडे बेदरकडे गडबड झाली.त्याचा फायदा घेऊन अहंमद याने अहमदनगर येथे निजामशाही स्थापन केली व १४९० त दांडाराजापूर घेतले. याच वेळी गिलानीनेही(मुंबई) माहीम जाळून गुजराथच्याशहाच्या आरमाराचा पराभव केला. तेव्हा महंमद बेगडागुजराथकर याने विजापूरकर व बेदरकर यांच्या मदतीने दाभोळवर स्वारी केली, त्यात त्याचे आरमार वादळात सापडून नाश पावले, परंतु सैन्यानें गिलानीशी कोल्हापुराजवळ लढाई दिली. तीत गिलानी ठार झाला. यावेळी गुजराथकर शहाच्या ताब्यात उत्तरकोंकणव ठाणे (राजधानी) होते. पण पुढे काही वर्षांनी पोर्तुगीजांनी हळूं हळूं तो प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. बहामनी राज्य मोडल्यावर कोंकणप्रांत आदिलशाही व निजामशाही यांच्यांत वाटला गेला. त्या दोहोंमधील सरहद्द सावित्री नदी होती असे म्हणतात; त्यामुळे चौल व दाभोळ ही बंदरे दोन्ही रियासतींत विभागली गेली.यावेळी कोंकणची स्थिती खालावलेली होती. ती सुधारण्याचाप्रथम प्रयत्न यूसुफ आदिलशहाने केला. शेतकर्यांच्यावरील सारा कमी करण्यात येऊन देसाई, देशपांडे व कुळकर्णी यांची वतनेत्याने कायम केली. हबशी हे जंजिर्यांत राहावयास केव्हां आले हे निश्चित समजत नाही. ते १४९८ त आले अशी एक दंतकथा आहे. मलिकंबरच्या वेळी निजामशाहीच्या आरमारांत दोन हबशी आरमाराचेअधिकारी होते, त्यापैकी एकाच्याताब्यात रायरी हे ठिकाण होते असे डफ म्हणतो. मुसुलमानी सैन्यांत व मोठमोठ्या हुद्द्यांच्या जागी बरेच हबशी होते. सोळाव्या शतकाच्या प्रारंभी कोंकणचे विभाग व महत्त्वाचीठिकाणे याबद्दलची माहिती पोर्तुगीज लेखांवरून पुढीलप्रमाणे आढळते :-  नागोठण्यापर्यंत गुजराथच्याशहाचा अंमल असून, श्रीवर्धन किंवा बाणकोटपर्यंत निजामशाहीचा ताबा होता आणि बाणकोटच्यादक्षिणेकडील गोव्यापर्यंतचा भाग आदिलशाहीच्या राज्यात मोडत असे. चौल व दाभोळ ही मोठी बंदरे असून ती सुरत व गोवें यांच्या बरोबरीची समजली जात. या वेळची दुसरी महत्त्वाचीगांवें म्हणजे डहाणू, तारापूर, केळवेमाहीम, अगाशी, वसई, वांद्रे, माहीम, नागोठणे, श्रीवर्धन,जैतापूर व खारेपाटण ही होत. चौल व दाभोळ या मोठ्या व्यापारी पेठा असून इराण व तांबडा समुद्र यांजबरोबर त्यांचा बराच व्यापार चालत असे. हिंदुस्थानच्या किनार्यावरील सर्व ठिकाणचे लोक दाभोळ येथे जमत असत, असे निकितिन म्हणतो. सोळाव्या शतकांत तेथील वस्ती बरीच असून इमारती सुंदर होत्या आणि देवालये व मशिदीही बर्याच होत्या, असे पोर्तुगीज इतिहासकार म्हणतात. इ.स. १५४७ त तेथें तटबंदीचे दोन किल्ले होते. ते पुढे पोर्तुगीजांनी पाडून टाकले. त्यांनी गुजराथच्याशहाच्या ताब्यातील कोंकणचा बराचसा भाग हाताखाली घातल्यामुळे दिल्लीकर मोगलाला कल्याणाखेरीज महत्त्वाचादुसराभाग मिळाला नाही. निजामशाहीचे व फिरंग्यांचे (पोर्तुगीजांचे) बहुधा सख्य असे; आदिलशाहीचीमात्र फिरंग्यांशी नेहमी कटकट होई. मलिकंबरच्या जमीनमहसुलीच्या पद्धतीने कोंकणच्या शेतकर्यांना पूर्वीच्यामुसुलमानी अमदानीपेक्षा जास्त सुखाचे दिवस गेले. त्याच्या मृत्यूनंतरदहा वर्षांनी हा कोकणीप्रांत आदिलशाहीत समाविष्ट झाला. त्यापूर्वीच निजामशाहीतशहाजी राजांनी उत्तरकोंकणांत स्वार्या करण्यास प्रारंभ केला होता व बरेचसे किल्लेही स्वतःच्या ताब्यांत आणले होते. त्यामुळे आदिलशाही व दिल्लीकर मोगल हे एक होऊन त्यांच्या मागे लागले. त्यांनी बरेच दिवस त्या दोघांनाही दाद दिली नाही. पण अखेरीस निजामशाहीतील फितुरीमुळेत्यांना स्वतंत्र सत्ता स्थापण्याचा प्रयत्न सोडून आदिलशाहीचेनोकर रहावे लागले. या आदिलशाहीत कोंकणची व्यवस्था पुढीलप्रमाणे होती. दाभोळ, अंजनवेल, रत्नागिरीव राजापूर हे प्रांत व तेथील कोट हे प्रत्यक्ष मध्यवर्ती सरकारच्या अंमलाखाली असत. याशिवाय उरलेल्या प्रांताचा कारभार देशमुखादि वतनदार हे वंशपरंपरेने पहात असत. कुडाळचे सावंत हे अशा देशमुखांत ठळक होते. दाभोळची सुभेदारी (जिल्हा)बरीच मोठी असून, तिचे मुख्य ठाणेविशाळगडजवळील प्रभानवल्ली या गावी होते; येथील ब्राह्मण सरदेसाई यांचे घराणे पुष्कळ वर्षांपासून तेथील वतनदार होते.याशिवाय आणखी दोन सुभेदार्या होत्या. कल्याणप्रांत (सुभेदारी)वैतरणी नदीपासून नागोठण्यापर्यंत असून तिच्यावरविजापुराहून सुभेदाराचीनेमणूकहोई. याशिवाय उरलेल्या सावित्रीनदीपर्यंतचा सर्व प्रदेश जंजिरेकर हबशाकडे असून त्याच्या ताब्यांत तळे, घोसाळे, रायरी हे किल्ले होते. मोंगलांचे (दिल्लीकर)व फिरंग्याचें विशेषसें तंटा भांडण होत नसे.  एकदां मोगलांनी सन १५८२ त फिरंग्याच्या दमण, डहाणु, व तारापुर या ठाण्यांवर हल्ले केले होते. परंतु अकबराच्या जनानखान्यातील एका फिरंगी नाटकशाळेच्या वजनानें त्यांच्यातलवकरच तह घडून आला असे जर्व्हिस म्हणतो (पृ. ८४). या नाटकशाळेच्या मार्फत फिरंग्यांना मोगलांकडूनबराच मुलुख मिळाला असेही तो सांगतो. पुढे पुन्हा एकदा स. १६१२ त मोगलाने दमण, वसई व चौल यांना वेढा देऊन आसपासचा प्रांत उध्वस्त केला. तेव्हा फिरंग्यांनी त्यांना बराचसा नजराणा देऊन व काही प्रांत सोडून त्यांच्याशी तह केला. यापुढें मात्र त्यांचा परस्पर बेबनाव फारसा झाला नाहीं. अकबराप्रमाणेच शहाजहानने फिरंग्यांशी भांडण उकरून काढले नाही. कोकणात मुसुलमानी अवशेष फारच थोडे आहेत व तेही महत्त्वाचेनाहीत. कोकणातील बहुतेक मुसुलमान बाटलेले हिंदू असल्यानें त्यांचा पेहराव व भाषासुद्धाअर्धवट मराठी आहे. कांही मुसुलमानांत तर हिंदूंचे देव पूजेस ठेविलेले असून लग्नप्रसंगीही ते हिंदू विधी बराचसा पाळतात.पोर्तुगीज अंमल— हिंदुस्थानचा मार्ग शोधून काढल्यानंतर पोर्तुगीज लोकांनी गोव्याच्याउत्तरेस १५०२ च्या सुमारास पहिली सफर केली असें म्हणतात. पुढे १५०८ त कांही पोर्तुगीज गलबतें लॉरेन्झो आल्मिडाच्या हाताखाली चौल येथील मुसुलमानी आरमारावर चालून गेली व त्याचा पराभव करून येथून तो दाभोळास गेला असतां तेथें निझामशाही अधिकार्याने त्याला व्यापाराचीपरवानगी दिली. मात्र गुजराथ व ईजिप्त येथील आरमारे एकत्र होऊनत्यांनी त्याचा पराभव केला. याप्रमाणे पोर्तुगीज लोकांना त्यांच्या पूर्वेकडीलसर्व व्यापार काबीज करण्याच्यामहत्त्वाकांक्षेमुळे प्रथमपासूनच शत्रू उत्पन्न झाले. कोंकणांतीलचौल व दाभोळ या महत्त्वाच्या बंदरांवर त्यांचाडोळा होता. यावेळी आदिलशाही व निजामशाही यांच्यात भांडणे सुरू होती. कोंकण प्रांत त्यांच्या दोघांत विभागला गेल्याने तिकडे त्यांचा धुमाकूळ चाले व त्याचा फायदा पोर्तुगीज घेत. निजामशहानेचौल येथे त्यांना वखार घालण्याची परवानगी देऊन बंदरांत येणार्या जहाजांचे संरक्षण करण्याचे कामही त्यांना सांगितले. आदिलशहानेंफिरंग्यांना ही सवलत दिली नसल्याने त्यांच्या ताभोळ बंदराला फिरंगी हे वारंवार त्रास देत. लुटालूट करण्याकरिता उत्तर कोंकणच्या किनार्यावर हल्ले चढवीत.  स. १५१७ त डीमटारोयो यानें वाड्यावर हल्ला करून तेथील मुसुलमान सुभेदाराचापराभव केला. स. १५२९ तील एका स्वारींत त्याने नागोठणे, वसई, आगाशी ही बंदरे जाळून ठाणे, वांद्रे, कारंजे व साष्टी ही गावे काबीज केली. गुजराथच्याशहाबरोबरहीयांच्या वारंवार चकमकी होत. यांचा सन १५२१ त व १५३० त असा दोन वेळा गुजराथकरांनी चौल येथे त्याचा पराभव केला. पुढे १५३३ त फिरंग्यांनी ८० जहाजे घेऊन वसईवर हल्ला करून तेथील तटबंदी पाडली व तारापूरापर्यंतची ठाणी जाळून टाकली. तेव्हा गुजराथच्याशहाने निजामशहाप्रमाणेच त्यांच्या संरक्षणाखाली आपले आरमार ठेवून त्यांना वसई देऊन टाकली. परंतु या दोघांतील स्नेह फारसा दृढ झाला नाही. पुढे १५४७ त फिरंग्यांनी आदिलशहाविरुद्ध निजामशहाशीव विजयनगरकरांशी तह केला आणि १५४८ त स्वारी करून गोवें ते श्रीवर्धन यांच्या दरम्यानची पुष्कळ गावें लुटली वजाळली. त्यांत दाभोळचें विशेष नुकसान केले. तेव्हां आदिलशहानेकाही बंदरे त्यांच्या हवाली करून तह केला. तरी सुद्धां फिरंग्यांनीं तो न पाळतां त्याच्या मुलुखाची पुष्कळदा नासाडी केली. त्यांनी १५४८ मध्येंच वसई येथे एक धर्मशिक्षणाची पाठशाळा काढून आपले धर्मोपदेशकवसई, ठाणे व चौल येथे पाठविले. स. १५६० त फ्रान्सिस्कन् धर्मोपदेशकांनी कान्हेरी व मंडपेश्वर येथें रहाणार्याहिंदू साधु व योगी यांनां घालवून तीं ठिकाणें आपल्या ताब्यांत घेतली.  घारापुरी, कान्हेरी व मंडपेश्वर ही स्थानेहिंदू लोक पवित्र मानीत, म्हणून तेथील खोदकामाचा नाश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मंडपेश्वर येथील गुहेच्या जागी त्यांनी ख्रिस्ती देऊळ बांधले आणि साष्टी येथे जुलुमाने ख्रिस्ती केलेल्या लोकांच्या मुलांना धर्मशिक्षणदेण्याकरिता एक पाठशाळा स्थापिली व तिच्या खर्चास त्या प्रांतांतील हिंदुधर्माच्या संस्थेचे पूर्वापार चालत आलेले वतनांचे उत्पन्न लावून दिले. पुढे क्रमाक्रमाने बहुतेक सर्व सत्ता या ख्रिस्ती भटांच्या हातात आली. इकडील या ख्रिस्ती धार्मिक संस्थांचे उत्पन्न इकडील फिरंगी राज्याच्याएकंदर उत्पन्नापेक्षाही जास्त झाले. गोवें येथील यांच्या धर्मविचारणी सभेची (इन्क्विझिशन) सत्ता उत्तर कोकणात सर्वत्र चालत असे. वाटेल त्या माणसाला पकडण्याचा तिला अधिकार असे. हा तिचा अधिकार इतका अमर्यादित होता की प्रसंगी त्याला लिस्बन येथील दरबारची व मुख्य धर्मविचारिणी सभेची मंजुरी मिळाल्यास खुद्द गोव्याचा फिरंगी सुभेदार (गव्हर्नर)व ख्रिस्ती जगद्गुरू (आर्चबिशप)यांनाही तिला पकडता येई. या अमर्यात सत्तेमुळे ख्रिस्त भटांनी पुष्कळ हिंदू लोकांस जुलुमाने बाटविलें व त्यांच्यावर अनेक अत्याचार केले. अशा बाट्या लोकांची संख्या (१८ व्या शतकांत) ६० हजारांपेक्षा जास्त होती असे म्हणतात. इ.स. १५५५ त फिरंगी सुभेदारानेहुकूम काढून वसई प्रांतांतील सार्वजनिक व खासगी देवळात हिंदूस पुजेची मनाई करूनब्राह्मणांकडून होणारे वेदपठण, होमहवन, सणांचे सार्वजनिक उत्सववगैरे बंद केले. हिंदु लोक मूर्तिपूजाकरितात कीं काय व मनाई केलेले धार्मिक विधी पाळतात की काय हे पहण्याकरितां त्यांच्या घरांच्या झडत्या घेत.त्यावेळी जर एखाद्याच्या घरांत मूर्ति सांपडली किंवा कोणी मनाईकेलेला धार्मिक विधी पाळतांना आढळला तर त्या माणसाला फाशी देत आणि त्याची सारी मालमत्ता जप्त करून ती अर्धी पाद्री भटांस व अर्धी अशी बातमी देणारास वाटून देत. यापुढे तर इ.स. १५९४ त रोमचा पोप व पोर्तुगालचा राजा यांनी हिंदुलोकांस जुलुमानें बाटविण्याचे हुकूम पाठविले. त्यामुळे इकडील पाद्रीभटांनी अनेक देवळांचा नाश करून वसई प्रांतातीललोकांस लुटण्याचा व अनेक युक्त्या प्रयुक्त्या करून त्यांना बाटविण्याचा धूमधडाका सुरू केला. एखाद्या विहिरीत पावाचा तुकडा टाकून सबंध गावचा गांव बाटवीत असे म्हणतात. अशा प्रकारे धर्मच्छलाचा अतिरेक झाल्यामुळेसर्वत्र असंतुष्टताउत्पन्न झाली. त्यामुळे पुढे फिरंग्यांचे जे उच्चाटन या भागातून झाले, त्यास हे एक विशेष कारण होते असेइतिहासकारांचे म्हणणे आहे. फिरंग्यांनी किनार्यावरील बहुतेक प्रांत १५६० पर्यंत काबीज केली. फार आंत जाण्याचा त्यांचा बेत नव्हता, कारण त्यांची आयात थोडी होत असे. यासाठी अल्बुकर्कने एक युक्ती काढली; त्याने गोव्यांतीलहलक्या जातीतील बायका-मुलींना बाटवून व त्यांनां जमिनी देऊन त्यांची लग्नें आपल्या फिरंगी शिपायांबरोबर लावून दिली. या बाट्यांच्या वंशंजांचा धर्म ख्रिस्तीच बनला आणि अधिकाराच्या जागा वगैरे कारणांमुळेत्यांचा ओढाहि फिरंग्यांकडेच वळळा. या वेळी फिरंग्यांच्या ताब्यांतीलप्रांतांत सुपीक भाग पुढील ठिकाणीं होता. रेवदंडा (नवे चौल), वसई व आगाशीमधील भाग वगैरे. दाभोळास त्यांची फक्त वखारच होती. इ.स. १५५६ त अशेरी व मनोर हे किल्ले त्यांनी घेऊन पुढे लवकरच पुष्कळदिवसांपासून डोळा असलेले दमण व तारापूरचा किल्ला (व गांव) घेतला. इ.स. १५५९ त हबशांनी संजाण व तारापुरावरहल्ला केला. परंतु त्यांत त्यांचा पराभव झाला. फिरंग्यांनी १५६९ व १५८३ त दोनदा कोळी लोकां (जव्हार)वरस्वार्या केल्या; परंतु दोन्ही वेळा त्यांचे फार नुकसान होऊन परास्त होऊन परत यावे लागले. यावेळी ते वैतरणीच्याकाठावरून घाटाच्या पायथ्यापर्यंत गेले होते असे म्हणतात. १५६० त आदिलशहा व निजामशहा एक होऊन त्यांनी फिरंग्यांवर चढाई करून गोवे व चौल येथे वेढे दिले, परंतु त्यांना यश आले नाही. रेवदंड्यासमुर्तुजा निजामशहानेवेढा दिला असता, त्याच्याच अधिकार्यांनी फितूर होऊन फिरंग्यांना समुद्राकडून वसईच्या सैन्याची कुमक मिळू दिल्यामुळेनिजामशहानेवेढा उठविला. फिरंग्यांनी निजामशहाच्

No comments:

Post a Comment

Total Pageviews