Sunday, 14 July 2013

नोकरि कशी शोधायची ?

नोकरि कशी शोधायची?कॉलेज संपले आता नोकरी शोधली पाहिजे, मला माझ्या नोकरित आता बदल हवाय, मी या नोकरिला वैतागलोय मला नोकरि बदलायची आहे, नोकरि शोधण्याची एक नाहि तरअनेक कारणे. नोकरी आणि तिही योग्य नोकरी शोधणे दिवसन दिवस कठिण होत चाललय, जागा ५ आणि अर्ज ५०० हि सध्याची परिस्थीती. ‘एम्प्ल्यॉयमेंट मार्केट’ हे दिवसागणिक आणखिनच अवघड होत चालले आहे आणि त्या साठीच तुम्हाला तुमच्या अंगातील सर्व कला या जॉब सर्वांच्या आधि शोधण्या साठी वापराव्या लागणार आहेत. नवीन जागा भरायची आहे तर त्या जागे साठीचा सर्वात पहिला अर्ज हा माझा असला पाहिजे आणि आपण कसे या पदासाठी योग्य आहोत हे संस्थेला सर्वांच्या आधी पटवुन देता आले पाहिजे, आणि इथेचसोशल मेडिया आपल्या मदतीला धावुन येतो.तर या आहेत काहि सोशल मिडिया टिप्स ज्या तुम्हाला तुमचा नविनआणि ड्रिम जॉब देऊ शकतात.लिंक्डईन:लिंक्डईन हि वेबसाईटच मुळी आहे प्रोफेशनल नेटवर्किंग साठी. लिंक्डईन मध्ये आपण आपला प्रोफाईल बनवुन त्या मध्ये आपलीव्यवसाया संबधीची माहिती देउ शकता. निट बनवला तर हा प्रोफाईल तुमचा ऑनलाईन बायोडेटाच बनुन जातो. पण बरेच जणे लिंक्डईन चा वापर पुर्ण पणे करत नाहित. लिंक्डईन मध्ये आपला प्रोफाईल हा १००% पुर्ण आहे याची खात्री करा आणि किमान एक तरी ‘रेकमेंडेशन’ आपल्या नावी असु द्या. आपल्या सध्याच्या मित्रांशी आणि सहकार्यांशी लिंक्डईन वर कनेक्टेड रहा.लिंक्डईन मधे ‘जॉब’ असा एक विभाग आहे, तिथे जाउन तुम्ही तुमच्या स्किलसेट्स ना योग्य होईल अशी नोकरी शोधु शकता. जरी योग्य नोकरी नाहि मिळाली तरी योग्य लोके जरुर मिळतील जे तुम्हाला नोकरी शोधण्यात मदत करु शकतील. अशी लोके ओळखा आणि त्यांच्याशी जरुर कनेक्ट व्हा. उदा. एखाद्या संस्थेचा रिक्रुटमेंट हेड अथवा ह्युमन रिसोर्स मधील मंडळी.ट्विटर:ट्विटर चा उपयोग हा फक्त काहितरी वाद घालायला किंवा मि सद्ध्या काय करतोय हे सांगण्या पुरता नाहि तर ट्विटर वापरुन तुम्हि तुमची नवीन नोकरि शोधु शकता. ट्विटर वरती अनेक लोकांना फॉलो करण्या आधि आपला स्वतःचा प्रोफाईल निट अपडेट करा. एक योग्य फोटो (अवतार) निवडा आणि मगच लोकांना फॉलो करणे चालु करा.फक्त आपल्या बद्द्लच नव्हे तर आपल्या कार्यक्षेत्रा बद्दल हि ट्विट करत चला. ट्विटर मधे फक्त जॉब नाहि तर व्यक्तिंना शोधा, आजकाल अनेक संस्था आणि रिक्रुटमेंट एजन्सीज ट्विटर वर आहेत. ते नविन जॉब ट्विटर वरती अपडेट करत असतात. यामुळे हा जॉब ट्विट केल्याक्षणिच आपल्याला समजु शकतो. उदा. KPITCummins (@kpitcareers), ADP (@adpcareers).फेसबुक:फेसबुकचा तसा थेट नोकरी मिळवण्यात वापर कमी आहे पण फेसबुक मध्ये तुम्हि अनेक लोकांशी अगदी कमी वेळात संपर्क साधु शकता आणि संवाद साधु शकता. त्यामुळे लिंक्डईन आणि ट्विटर मार्फत ज्या व्यक्ती तुम्ही शोधल्या आहेत त्यांच्याशी परिचय वाढवण्या साठी तुम्हि फेसबुक मध्ये त्यांचे मित्र बनुशकता. आणि हो आपला फेसबुक प्रोफाईल अतिशय व्यवस्थितपणे बनवा. तुमच्या आवडीनिवडि, छंद, आवडते खाद्यपदार्थ, पुस्तके, लेखक इत्यादी वयक्तिक स्वरुपाची माहिती ज्या मुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व समजते, अनेक रिक्रुटर्स एखाद्याला नोकरिवर घेण्या पुर्वी त्याचा फेसबुक प्रोफाईल नक्कि पाहतात. असे होऊ देउ नका कि तुम्ही मुलाखती मध्ये माझा वाचन हा छंद आहे असे सांगाल आणि फेसबुक प्रोफाईल मध्ये वाचन बिलकुल आवडत नाहि असे लिहिलय. तुम्हाला त्वरित खोटारडा ठरवुन बाद केले जाईल. त्या मुळे फेसबुक प्रोफाईल कडेही व्यवस्थित लक्ष असु द्या.युट्यूब:सचिन तेंडुलकरची ड्बल सेंचुरी पुन्हा पहायची आहे, पाहिजेल तेंव्हा पाहता येईल. युट्यूब वर अनेक चाहत्यांनी तो विडिओ अपलोडकेला आहे ना. पाहिजे तेंव्हा सचिनची सेंचुरी पहा. तसेस पाहिजे तेंव्हा रिक्रुटर्स ना आपली माहिती काहि क्षणात मिळवताआली आणि तिही आपल्याच मुखातुन तर? दर वेळी भेट होईलच असे नाहि या साठी आपला ‘विडिओ रेस्युमे’ बनवुन तो युट्यूब वर अपलोड करुन ठेवा. सध्या विडिओ रेस्युमे चा सर्वात मोठा फायदा म्हणजे अगदि फारच कमी लोकांचा स्वत:चा विडीओ रेस्युमे आहे. अनेकांच्यातुन वेगळे असे काहि आपले असलेले केंव्हाही चांगलेच ना. एक चांगला विडिओ रेस्युमे हा छोटा, आपल्या बद्द्ल माहिती देणारा, आपण संस्थेस कसा फायदा पोहचवुन देऊ शकु हे सांगणारा असावा.वरिल सोशल मिडीयां सोबतच आपण गुगल अलर्ट्स, फ्रिलांसिंग, ट्विटर सर्च, स्वतःचा ब्लॉग इत्यादि वापरुन हि जॉब शोधु शकता. हे सर्व पर्याय जर एकत्रितपणे व्यवथित नियोजन करुन वापरलेतर फक्त आपल्या नजिकच्याच नव्हेतर संपुर्ण जगातील रोजगारसंधी आपणास उपलब्ध होतील, गरज आहे ती फक्त ‘सोशल’ होण्याची.

No comments:

Post a Comment

Total Pageviews