बीजिंग- येथील एका इन्स्टिट्यूटने 100 मेगापिक्सेलचा कॅमेरा तयार करण्यात यश मिळविल्याचा दावा नुकताच केला आहे. चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सने (सीएएस) उच्च दर्जाचा कॅमेरा तयार केला आहे. या कॅमेऱ्याला IOE3-Kanban असे नाव दिले आहे. 10,240 x 10,240 एवढ्या साइजचे छायाचित्र या कॅमेरामधून मिळत आहे, असे "सीएएस'ने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवदेनात म्हटले आहे. कॅमेरा वजनाने हलका व लहान आहे. या कॅमेरामधून काढलेल्या छायाचित्रांचा दर्जा उत्कृष्ट असल्याचेही निष्पन्न झाले आहे. कॅमेरामध्ये अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. विविध बाजूंनी त्याची तपासणी करण्यात आली असून, त्याला यश मिळाले आहे, असेही "सीएएस'ने निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment