Wednesday 30 April 2014

महान राष्ट्र ते महाराष्ट्र

राजकीय दृष्टीकोनातून मी माझ्या महाराष्ट्राकडे १ मे १९६० या महाराष्ट्राच्या स्थापना दिवसाच्या आधी पासुणच्या इतिहासाकडे जातो. महाराष्ट्राच्या व देश्याच्या हितासाठी अनेक हुतात्मांनी बलिदान दिले आहे त्यातील काही नावे जगन्नाथ शंकरशेठ, बाळशास्त्री जांभेकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले, गो. ग. आगरकर, पंडिता रमाबाई महर्षी, डॅा.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटिल, महाराजा सयाजीराव गायकवाड, बाबा आमटे या सारख्या अनेक लोकांनी आपले राजकीय, सामाजिक पुर्णवसन करण्यासाठी आपल्या परीने बलिदान दिले आहे परंतु मला आज यांच्या कुठल्याचा कार्याचा भाग, यांचे विचार, तत्वे, कर्तव्य आजच्या राजकर्त्यामध्ये मला दिसत नाही याचे सर्वात अधिक दु;ख होत आहे. आजचे राजकीय नेते एकमेकांवर कुरघोडि करण्यात अधिक व्यस्त होतांना दिसत आहे, जनतेच्या कुठल्याच प्रश्नावर एकत्र येण्यापेक्षा त्यात कुठलेना कुठले कारण शोधुन त्यावर राजकारण करण्यात यांचा वेळ जात आहे. अशी वर्षानुवर्ष संपत आहेत, शेतक-यांचा प्रश्न, बेकारी, महाँगाई, सुरक्षा या सर्वच गोष्ठीवर मला माझा महाराष्ट्र मागे पडतांना दिसत आहे जर या देशांचा महाराष्ट्राचा विकास हवा असेल तर शेतकरी जगला पाहिजे यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासात समाजाला व सरकारला भारतीय शेतक-यांचा हालाखीच्या परीस्थितीचे विदारक दर्शन घडवुन त्यांच्या प्रश्नाना वाचा फोडण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले होते. “शेतक-यांचा असुड” या ग्रंथाद्वारे त्यांनी उच्चवर्णीय व सरकारी अधिकारी शेतक-यांचे शोषण करतात हे त्यांनी जगाला दाखवुन दिले परंतु आजच्या राजकीय नेत्यांना शेतक-यांचा व मागासवर्गीयांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही त्यांच्या जीवनाविषयी दयामाया नाही “पैसा झाला मोठा” या म्हणीप्रमाणे ते वागत आहेत.
आजच्या या राजकीय व विज्ञान युगात महाराष्ट्र खुपच मागे पडला आहे कारण राष्ट्राच्या उभारणीत मोलाचा वाटा सामान्य जनतेपाठोपाठ राजकीय नेत्यांचा आहे परंतु आज जेव्हां आपण आपल्या लोकप्रतिनिधींना निवडुन देत असतो त्याप्रमाणे प्रत्येक लोकप्रतिनिधी आपली खाती सांभाळत असतात परंतु हे सर्व होत असतांना मला असे दिसते की ज्या लोकप्रतिनिधीनां जे खाते दिले जाते त्या खात्यातील त्यांना पुरेसे ज्ञान नसल्यामुळे ते व्यवस्थितपणे हाताळले किंवा सांभाळले जात नाही म्हणजे त्या विभागाचे काम व्यवस्थितपणे होत नाही परिणामी जनतेचे प्रश्न अपुर्णपणे सोडविले जातात व त्याचा परिणाम समाजाच्या व्यवस्थेवर होतो हे सर्व थांबले पाहिजे म्हणजेच जो लोकप्रतिनिधीना ते खाते सांभाळले जात नाही म्हणजेच त्या विभागाचे काम व्यवस्थितपणे होत नाही परिणामी जनतेचे प्रश्न अपुर्णपणे सोडविले जातात व त्याचा परिणाम समाजाच्या व्यवस्थेवर होतो हे सर्व थांबले पाहिजे म्हणजेच जो लोकप्रतिनिधी जे खाते सांभाळतो त्याला त्या खात्याचे संपुर्ण ज्ञान असलेच पाहिजे, जर तो अर्थमंत्री असेल तर तो अर्थशास्त्रज्ञ असला पाहिजे म्हणजेच जर तो आरोग्यमंत्री असेल तर तो डॅाक्टरच असला पाहिजे जर तो क्रिडामंत्री असेल तर तो एक खेळाडुच असला पाहिजे तरच त्याला आपला कार्यभाग साधता येईल. व खर्या अर्थाने त्या खात्यात व लोकांचा विकास होईल.
दूसरे असे कि ज्या लोकप्रतिनिधी आपण निवडुन देतो त्यांना शिक्षणाची अटच नाही परंतु आजची गरज ही त्यांना साक्षर होण्याची आहे कमीत-कमी शिक्षणाची अट घातली पाहिजे असे माझे व्यक्तिगत मत आहे. भ्रष्टाचार हा सुद्धा मुद्दा खूप महत्वाचा आहे यामुळे जनतेची विकास कामे होत नाही परिणामी सर्वच स्थिर होते या स्थितीला सामान्य माणुसही तितकाच जबाबदार ठरला आहे कारण तो आपल्या मतदानांचा हक्क बजावत नाही आणि लोकप्रतिनिधी तो काय विकासाची कामे केलीत? असा प्रश्न विचारत नाही म्हणुनच राजकीय नेत्यांना या सर्वामधुन मोकळीक मिळते व ते जनतेच्या गाफिलपणाचा फायदा घेतात म्हणुनच वर्षानुवर्ष महाराष्ट्राचा घाट घातला जात आहे.
सांस्कृतिक च्या चष्म्यातून जर मी माझ्या महाराष्ट्राकडे बघितले तर मी अत्यंत आनंदी होतो तरीही काही त्रुटी आहेत राज्याच्या लोकसंख्येची धार्मिक संरचना बरीचशी देशाच्या धार्मिक संरचनेशी मिळती-जुळती आहे, हिंदु बहुसंख्य असुन त्यांची लोकसंख्या बरीच आहे. अल्पसंख्यामध्ये राज्यातील एकुण लोकसंख्येच्या ९ टक्क्याच्या आसपास आहे तर त्याच्या खालोखाल म्हणजेच एकुन लोकसंख्येच्या ७ टक्क्याच्या आसपास इतकी लोकसंख्या बौद्ध धर्मिंयाची आहे, महाराष्ट्राला संताची भूमी म्हणुन गौरविले जाते त्यात प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, रामदास यासारख्या अनेक संतानी आपल्याला अध्यात्मिक वारसा दिला आहे परंतु आजच्या “सुपर पावर” युगात त्यांचा विसर पडला आहे. माझ्या मताने संतानी जे अभंग, ज्ञानकोष लोकांसाठी लिहुन ठेवले आहेत त्याची उजळणी करण्याची वेळ आली आहे तरच सांस्कृतिक मर्यादा टिकुन राहतील. प्रत्येक समाज्याच्या चालीरिती त्यांची धार्मिक कार्य यांचा पसारा खूप मोठा आहे. या सर्व गोष्टीनी महाराष्ट्राला एकसंध ठेवले आहे. परंतु आज सांस्कृतिक कार्याच्या नावाखाली जो विभित्स प्रकार चालला आहे त्याला थांबविले पाहिजे, टिव्ही व इतर प्रसार माध्यमांच्या माध्यामातून लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहचविल्या पाहिजेत तरच सुदृढ, निरोगी महाराष्ट्राच्या उभारणीला मदत होईल.
औद्योगिक दृष्टीकोनातून जर मी माझ्या महाराष्ट्राकडे बघितले तर स्वातंत्र्यापुर्वी पासुनची औद्योगिक परंपरा आहे, महाराष्ट्र हे भारतीय संघराज्यातील सर्व राज्यापैकी एक महत्वाचे औद्योगिक राज्य होय. महाराष्ट्राच्या या गर्भातून दगडी कोळसा, मैगनीज, लोहखनीज, बॅाक्साईट, क्रिनाईट यासारखी अनेक खनिजे मिळतात. महाराष्ट्रात २८,८१६ कारखाने आहेत म्हणजेच महाराष्ट्राची औद्योगिक जडण-वडण मजबूत आहे. त्यात मोलाचा वाटा हा शेतीचा सुद्धा आहे. महाराष्ट्रात जल विद्युत प्रकल्प, अणुविद्युत प्रकल्प, लघु उद्योग कागद गिरण्या, साखर कारखाने, लाकुड कारखाने, कापड गिरण्या इत्यादि सर्व उद्योग धंदे महाराष्ट्राच्या वाटयाला आली आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात भारतातील पाहिला साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील लोणी बुदुक(प्रवरानगर) येथे १७ जून १९५० रोजी उभा राहिला. या औद्योगिक जडण-घडणीत महाराष्ट्राच्या भरणीत माहिती- तंत्रज्ञानाचा सुद्धा वाटा मोठा आहे. म्हणजेच रोजगाराच्या संधी महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे आहेत परंतु येथे राहणा-या भूमिपुत्रांना रोजगार मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे परिणामी येथील शिक्षित तरुणांवर बेरोजगाराची पाळी येत आहे. म्हणजेच शिक्षण असुन नोकरी नाही अशी बिकट अवस्था आहे. आपले हक्क मिळविण्यासाठी तरुणांना संघर्ष करण्याची वेळ आली आहे परंतु हा संघर्ष परकोठीचा नसावा हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे येथील औद्योगिक वातावरण पोषक असुनही नोकरीसाठी वणवण फिरावे लागत आहे म्हणुन सरकारने उद्योगधंदयाना अधिकाधिक सवलती देवुन रोजगार उपलब्ध केला पाहिजे जेणेकरुन येथील तरुणवर्ग आपल्या परिवाराला सुखी ठेवु शकेल.
थोडक्यात माझा महाराष्ट्र सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व औद्योगिक क्षेत्रात प्रगतिसंपन्न होवुन जगाच्या नकाश्यावर स्पष्ट असा हवा माझा महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.

No comments:

Post a Comment

Total Pageviews