2014 मध्ये पोलीस दलातील साडेबारा हजार जागा भरण्याची घोषणा आज गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानसभेत केली. तसंच पोलीस भरतीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी 5 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णयही सरकारनं घेतला आहे.शासनाकडून लवकरच 122 नवीन पोलीस ठाणे आणि 384 नवे पोलीस कंट्रोल रुम्सची निर्मिती करण्यात येणार आहे. तसंच पोलीस कर्मचाऱ्यांच्या 61 हजार 494 जागा नव्यानं निर्माण केल्या जाणार असल्याची माहिती आर.आर. पाटील यांनी दिली. त्यातल्या साडेबारा हजार पोलीसांची भरती येत्या वर्षात करणार असल्याचंही गृहमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.61 हजार पोलिसांपैकी 7 हजार पोलिस हे लहान मुलांच्या अपहरण प्रकरणांच्या तपासासाठी नेमण्यात येणार आहेत. तर 6 हजार पोलीस वाहतूक नियंत्रणासाठी असतील अशी माहिती आर.आर.पाटील यांनी विधानसभेत दिली आहे.
No comments:
Post a Comment